top of page
WhatsApp Image 2025-12-11 at 2.04.47 PM.jpeg

स्नेहपूर्वक जय महाराष्ट्र

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी शिवसेना आणि युवासेनेच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक कार्यास सुरुवात केली. आज, शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि युवासेनाप्रमुख मा. श्री. आदित्य साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, गेली १० वर्षे मी शिवकार्यातून जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.
माझे वडील मा. श्री. भागवत कदम (शाखाप्रमुख, शाखा क्र. ६१, २०११) यांच्यामुळे मला घरातच भगवे वातावरण आणि बाळकडू मिळाले.
सुरुवातीचे कार्य: 
१. शिवसेना सदस्य नोंदणी, मतदार नोंदणी आणि मोर्चे यातून कार्याची सुरुवात केली.
२. विद्यार्थी राजकारण: महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या न्याय-हक्कांसाठी कॉलेज युनिटची स्थापना केली. ग्रामीण भागात युवासेना-युवती सेनेच्या माध्यमातून पक्षबांधणी केली.
३. सामाजिक आणि क्रीडा कार्य: महिलांसाठी क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन केले आणि अनेक मंडळांच्या माध्यमातून सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
४. कोविड महामारीतील कार्य: 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या उपक्रमातून लोकांना मदत केले. गरजूंना धान्य ही वाटप केले.
५. महिला व मुलींच्या स्वसंरक्षणाचे कार्यक्रम राबवले आणि सॅनिटरी पॅडचे ही वाटप केले.
निष्ठा: माझी निष्ठा आणि विश्वास सदैव 'मातोश्री' आणि उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आहे. 'पक्ष मला काय देईल' यापेक्षा 'मी पक्षासाठी काय करू शकते' हेच माझे ध्येय आहे.


जय हिंद! जय महाराष्ट्र!

bottom of page